तेर (प्रतिनिधी)-कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालय तेर येथे विविध कार्यक्रमाने उत्सवात साजरी करण्यात आली. 

सकाळी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष एजाज बागवान, मुख्याध्यापक बेदरे जे.के, पर्यवेक्षक सुशीलकुमार पाटील, हभप. रघुनंदन पुजारी महाराज, साहेबराव मेटे, तानाजी पिंपळे, केशव सलगर, किरण अबदारे, पवन भंडारे, नरहरी बडवे, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष संजय जाधव, बबन कोकरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ अबदारे,अविनाश पाडुळे, किशोर काळे,नारायण भंडारे, त्रिशाला बुबणे ,पवन लाकाळ यांच्या हस्ते  प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर बेटी बचाव बेटी पढाओ,  स्वच्छता अभियान, मोबाईलचे दुष्परिणाम यावर चित्ररथ तसेच लेझीम पथक, वारकरी दिंडी सह जनजागरण फेरी काढण्यात आली. यासाठी  बळवंतराव एस. एस., कांबळे बी. डी.,चव्हाण एल. टी.,गोडगे एस. यु, खटिंग एस.एस, कोळी एस. टी, गांगुर्डे एस. टी, भालेराव एन. यु., देवकाते आर. एम,कांबळे एम. एल, शितोळे एम .एन, नितलीकर ए.बी., काणेकर एम. बी,घाडगे एस .डी,सामते एस .एस, पाटील एस. आर,रणदिवे इ. एन,पाटील एस. बी,भंडारे व्ही. एम, साखरे आर .ए.,करण कांबळे यांनी परिश्रम घेतले.


 
Top