तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर जवळील तेरणा मध्यम प्रकल्पावरील उजवा व डावा कालवा विशेष दुरुस्ती 3 कोटी 41 लाख रुपये किंमतीच्या कामांचे भूमिपूजन आ.राणाजगजितसिह पाटील यांच्या हस्ते 3 फेब्रुवारीला करण्यात आले.

यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ऐ.एन.मदने, उपविभागीय अभियंता डी.एम.नाईकनवरे, शाखा अभियंता एस.एस.वाघमारे, सुरेश देशमुख, अनंत देशमुख,ॲड.दत्तात्रय देवळकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव नाईकवाडी, श्री संत गोरोबा काका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्माकर फंड, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड,माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी,तेर सोसायटीचे चेअरमन सतिष कदम, भास्कर माळी, बालाजी पांढरे,मंगेश फंड, प्रविण साळुंके, अनंत भक्ते, नारायण साळुंके,अजित कदम, अभिजित सराफ, गणेश फंड, नवनाथ पसारे, तानाजी बंडे, मयूर तापडे, नवनाथ इंगळे,भारत नाईकवाडी, विलास रसाळ, सोमनाथ फासे, अनिल टेळे,रामा कोळी, संजय लोमटे,प्रतिक नाईकवाडी, अर्शाद मुलांनी, किशोर काळे, जुनेद मोमीन व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


 
Top