तुळजापूर (प्रतिनिधी)-मराठा क्रांती मोर्चा वतीने सतत गैरहजर असणाऱ्या एम एस ई बी उपअभियंता विनायक सूर्यवंशी यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला. उप अभियंता विनायक सूर्यवंशी हे सतत गैरहजर असल्यामुळे तालुक्यातून येणाऱ्या वीज ग्राहकांचे अतोनात हाल होत आहेत. या अगोदरही उपअभियंतांना विनंती करूनही ते आपल्या कार्यालयामध्ये वेळ देत नाहीत त्यामुळे लोकांची कामे खोळंबली आहेत वीज बिलाची दुरुस्ती असो वीज बिल भरण्यासंदर्भातल्या अडचणी असो या सर्व कांहीं अडचणीचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे. या कारणास्तव आज दिनांक 16/02/2024 रोजी उप अभियंता विनय सूर्यवंशी यांच्या खुर्चीला हार घालून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला निषेध करण्यात आला. या उपर ही आपला कामात प्रशासनाने दुरुस्ती केली नाही तर या कार्यालयाला कुलूप घातल्याशिवाय मराठा क्रांती मोर्चा स्वस्थ बसणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला. यावेळी युवा नेते अमोल कुतवळ, महेश गवळी, कुमार टोले, सत्यजित साठे, सुदर्शन वाघमारे तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top