धाराशिव (प्रतिनिधी)-सभासदांना व ग्राहकांना सर्वोत्तम बँकिंग सेवा प्रदान करणाऱ्या श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटीला सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा बँको ब्लू रिबन पुरस्कार मिळाला आहे. दिव दमन (केंद्रशासित प्रदेश) येथे एका दिमाखदार सोहळ्यात संस्थेस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सहकारी संस्थासाठी दिव दमन (केंद्रशासित प्रदेश) येथे दोन दिवसीय ॲडव्हाटेंज सहकार परिषद पार पडली. सहकारातील महत्वाच्या विषयावर चर्चा सत्र आणि इतर कार्यक्रम घेण्यात आले. सहकार परिषदेला राज्यातील  नामवंत संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटीला सर्वोत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार मिळाला. ग्राहकांना सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने सुरु असलेल्या कार्याची दखल पुरस्काराच्या रूपाने घेण्यात आली. या गोष्टीचे विशेष समाधान आहे. पुरस्कार मिळण्याने आणखी जबाबदारी वाढली असून नवीन उर्जा मिळाली आहे.  सदरील पुरस्कार माजी सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्या हस्ते संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव यांनी स्वीकारला. यावेळी अरविंद गोरे, देविदास कुलकर्णी व रामचंद्र सारडे याची उपस्थिती होती.


 
Top