तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मसलाखुर्द येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी विश्वनाथ तात्या नरवडे  55 यांचे गुरुवार दि. 22 फेब्रुवारी रोजी राञी  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. द्राक्षचे भाव गडगडल्याने ते सतत चिंतेत होते. या तणावामुळे हदयविकाराचा तीव्र झटका येवुन त्यात त्यांचे निधन झाल्याची चर्चा असून, शासनानेे त्यांना मदतीचा हात देण्याची मागणी ग्रामवासियांमधुन व्यक्त केली जात आहे.


 
Top