तुळजापूर (प्रतिनिधी) -  तुळजापूर तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश्य स्थितीत शेतमालाला भाव येईल असे वाटत असताना उलट शेतमालाला भाव मिळत नसल्याने दुष्काळात तेरावा महिना ही म्हण तंतोतत लागु होत आहे. दुष्काळ मुळे उत्पन्न कमी झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल येईनासा झाल्याने शुकशुकाट दिसत आहे. 

मागील वर्षी  सोयाबीनला 1 ते15 फेब्रुवारी 2023 मध्ये याच कालावधीत सोयाबीन जास्तीत जास्त भाव  7100 रूपये  व  तुरीला 8500 रुपये भाव मिळत होता. यंदा अत्पल्प पावसामुळे उत्पन्न कमी येवुन ही 1 ते 15 फेब्रुवारी 2024 या काळात सोयाबीनला जास्तीत जास्त 4500 रुपये व तुरीला 10,000 रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे. सोयाबीनचा हमीभाव 4600 रुपये व तूरीचा हमीभाव 7100 रुपये आहे.  सोयाबीन मागील वर्षी पेक्षा निम्याने म्हणजे 2500 पोते आवक आहे. तरीही भाव निचांकी मिळत आहे. तुर आवक मागील वर्षी पेक्षा कमी म्हणजे 250 पोते असुन दरात दीड हजाराने वाढ झाली आहे.

दुष्काळात उत्पन्न कमी येवुन ही सोयाबीनला मागील वर्षी एवढाच भाव मिळत आहे. तर तूरीचा भाव माञ दोन हजाराने वाढला आहे. यापुर्वी सोयाबीनचा दर दहा हजार आसपास गेला होता. नंतर तो सात हजारावर आल्या पासुन शेतकऱ्याने भाव वाढेल या आशेवर दोन वर्ष सोयाबीन ठेवले. दोन वर्षात वजनघट  नंतर निचांकि भाव यामुळे पैसे हि कमी मिळाले. यंदा पाच हजारचा पुढे भाव गेलाच नाही. याला कारण सोयाबीन व तेल आयातीमुळे कमी उत्पन्न येवुन ही निचांकी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन घालावे लागल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधुन येत आहेत.


 
Top