तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील सिंदफळ भागात  असणाऱ्या श्रीमुदगुलेश्वर शंभुमहादेव  देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे.

येथे महाशिवराञीला मोठी याञा भरते. या आगामी महाशिवराञ याञा पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी तर या रस्ताची तात्काळ दुरुस्ती करुन दुचाकी, तीन चाकी वाहने नेणे व चालण्या योग्य करण्याची मागणी होत आहे. केंद्र राज्य सरकार तिर्थक्षेञ विकासासाठी मोठे योगदान देत असताना कुणाच्या दुर्लक्षमुळे या तिर्थक्षेञाला जाण्यास रस्ता व्यवस्थित होवु शकत नाही याची चौकशी करण्याची मागणी होते. देवस्थानांकडे सरकारचे लक्ष व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असा प्रकार तालुक्यात दिसुन येत आहे.

या रस्त्यावरून जाणे म्हणजे एक प्रकारे अपघाताला निमंत्रण दिल्यासारखे आहे. केवळ खराब रस्त्यामुळे या निसर्गरम्य पविञ देवस्थानकडे भाविकांना जाणे कठीण बनले आहे. हे देवस्थान घनदाट वनराईत असल्यामुळे या देवस्थानाला पर्यटकांसह भाविकांचीही संख्या मोठी आहे. मात्र, या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळणी झाली असल्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांची मोठी कसरत होत आहे.

तुळजापूर तालुक्यातील अध्यात्मीक  वारसा लाभलेले तीर्थक्षेत्र श्री मुदगुलेश्वर शंभु महादेव मंदिर आहे. यांची तीर्थक्षेत्रासह पर्यटन स्थळ म्हणूनही ओळख आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर शहरापासून साधारतः तीन ते चार किमी अंतरावर असणाऱ्या या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यावर अर्धाफुट खोल खड्डे पडले आहेत. डांबरी रस्ता येथे होता याचा लवलेश ही येथे जाणवत नाही. अशी अत्यंत बिकट अवस्था या रस्त्याची झालेली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी शुभविवाह सह अनेक कार्यक्रम होतात.




 
Top