तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील हडको परिससरातील विवाहित महिलेच्या आत्महत्या प्रकरणी नवरा व सासु विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील आत्महत्या  घटना राञी आठ वाजता उघडकीस आली होती. सदरील आरोपी विरोधात मरणास कारणीभुत करण्याच्या मागणीसाठी मयताचा नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेवुन मागणी केली होती.

या बाबतीत अधिक माहिती अशी की, चिवरी येथील गायञी हिचे तुळजापूर येथील अतिश दरेकर बरोबर दीड वर्षापुर्वी लग्न झाले होते. सहा महिन्या पासुन विवाहीतेस लग्नामध्ये तुझी आई वडिलांनी आम्हाला काही एक करणी धरणी केली नाही. माहेर होऊन आई-वडिलांकडून घर संसार उपयोगी सामान भांडी व पैसे  घेऊन ये म्हणून सतत मारहाण शिवीगाळ करून तिचा मानसिक शारीरिक छळ  करून तिचे मरणास कारणीभूत  नवरा व सासु असल्याची फिर्याद व जबाब वरून तुळजापूर पोलिस ठाण्यात नवरा अतीश दरेकर व सासु स्वाती संजय दरेकर विरोधात मुलीचा वडीलांनी दिलेल्या फिर्याद वरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात  गु.र.नं-53/2024 कलम 498अ,323,504,306,34 भादवी अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे


 
Top