तेर (प्रतिनिधी)-25 जानेवारी ते 28 जानेवारी या चार दिवसाच्या कालावधीमध्ये स्वयंशिक्षण प्रयोगांतर्गत मंजिरी सखी प्रोडूसर कंपनी व यांच्यावतीने  येवती, बरमगाव ,हिंगळजवाडी आणि खामसवाडी या चार गावांमध्ये आरोग्याची तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 447 रूग्नाची तपासणी करण्यात आली.

यावेळी बी.पी ,शुगर, एच .बी.आणि डोळ्याची तपासणी करण्यात आली.या तपासणी दरम्यान  बी.पु. ,शुगरचे 43 नविन रूग आढळून आले आहेत.   यावेळी मंजिरी सखी प्रोडूसर कंपनीच्या संचालिका दिपाली थोडसडे, राणी शिराळ ,कोमल कटकटे, कंपनीचे योगेश टाले, लॉर्ड फाउंडेशनचे महेंद्रजी के.टी., महेश टी.पी. उपस्थित होते. यावेळी बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका हवले, ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका सोनवणे  यांनी नागरीकांचे बीपी, शुगर ,एच.बी.  तपासून त्यांना असलेल्या आजाराप्रमाणे औषधेही देण्यात आली.  चार दिवस चाललेल्या शिबीरामध्ये 447 नागरीकानी तपासणी करून घेतली.


 
Top