धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ, धाराशिवचा महाराजा व मानाचा गणपती गणल्या गेलेल्या या रंगमंचकावर शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांनी बालपणी महादेवाच्या मंदिरामध्ये ,महादेवाच्या पिंडीवर आपले स्वतःचे बोट कापून रक्ताभिषेक करून व मावळ्यांच्या सर्वांच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी प्रतिज्ञा घेणारे असे मूर्तीच्या स्वरूपातील दृश्य व तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देऊन अन्याय,अत्याचार ,जुलूम  राजवटीविरुद्ध वापर करून स्वराज्य व सुराज्य निर्मितीआशीर्वाद देणारे दृश्य, छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले व दरबारात मावळे सरदार आजूबाजूस उभे राहून आपला आदेश असावा व आम्हास स्वराज्य निर्मितीसाठी, प्रेरणा द्यावी. या भूमिकेतील मूर्तीच्या स्वरूपातील दृश्य सादर केले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तींचे पूजन व श्री ची पूजाविधि गुणवंत कामगार पुरस्कार  मनमत आप्पा पाळणे, काशिनाथ दिवटे, विशास दळवी, संजय पाळणे व प्रा. गजानन गवळी यांच्या प्रमुख शुभ हस्ते करण्यात आली.  

जिल्हा सुवर्णकार व सराफ असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व सदस्य प्रामुख्याने सर्व उपस्थितच्या शुभ हस्ते श्रीची पूजा विधि व छत्रपती शिवाजी महाराजांच्या व तुळजाभवानी मातेची पूजा अत्यंत शास्त्रशुद्ध मंत्र उच्चारात भक्ती मयआणि शिवमय वातावरणात, काशिनाथ दिवटे यांच्या आवाजात संपन्न झाली. यावेळी गणपती बाप्पा मोरया, आई राजा उदे उदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा विविध जयघोषात संपन्न झाली. मंडळाच्या व्यासपीठावर फुलांनी व विद्युत रोशनाई देखना व आकर्षक देखावा सादर केला होता. सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर महादेवाची पिंडीवर पूजा विधी सारखा गंध लावून ,आम्ही सर्व शिवभक्त आहोत व भारत देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार, विचार व संस्काराने सुराज निर्माण झाले पाहिजे अशी प्रार्थना , पूजा व प्रतिज्ञा करण्यात आली. या सर्व कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी विश्वास दळवी, वरून साळुंखे, बसवेश्वर पाळणे, कुणाल दिवटे , दुर्गेश दिवटे ,आकाश सुरवसे, गोटया सापते ,अभय हंबीरे, घुले बंधू, मुझे मिल पठाण, राम वंजारी  थडवे बंधू, टेहरे  खाडे, लक्ष्मण ओबासे, खंडेलवाल ,राम पाटील  युवराज हुच्चे ,कोचेटा, मनोज अंजीखाने  वैभव अंजीखाने, अश्विन हंचाटे ,पाटील,नंदकुमार हुच्चे ,इत्यादी कष्ट घेतले ढोल व ताशाच्या आवाजावर व फटाक्यांच्या, शोभेच्या दारूच्या आतषबाजीने अत्यंत जोशपूर्ण, उत्साही व आनंदी वातावरणामध्ये शिवजयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरी करण्यात आली. सर्व शिवभक्तांना पेढे व प्रसाद वाटप करण्यात आला. मंडळाच्या या 61 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर देखावा सादर करण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्व उत्कृष्ट मंडळ म्हणून महाराष्ट्र शासनाने गौरीविलेले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र हुच्चे व आभार मानण्याचे कार्य केले.


 
Top