धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील सांजा रोड जवळील कल्पतरू नगरीतील नागरिकांच्या सहभागातून विठ्ठल व रूक्मिणी मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. खुल्या जागेत कल्पतरू नगरीतील नागरिकांच्या सहभागातून मंदिराचे काम पुर्ण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मुर्ती स्थापना करण्याचा योग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी करण्यात आला.

विधीवत होमहवन,किर्तन व भजन करण्यात आले.तसेच महिलांनी भजन म्हणत विठ्ठल रूक्मिणी मुर्तीची पुजा करण्यासाठी गर्दी केली होती.मुर्ती स्थापनेसाठी चंद्रकांत चौधरी,सुनिल पवार,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,संपत सुतार,सौरव मुंडे, बाळासाहेब हजारे,शिवाजी चव्हाण,सतिश मेंढेकर,आण्णासाहेब पवार,सारंग गिरी, यांच्या हस्ते मुर्ती स्थापन करण्यात आली.तसेच सर्व जेष्ठ नागरिक यांच्या हातुन पुजा करून कल्पतरू नगरीतील नागरिकांना भोजन व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


 
Top