धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणा संदर्भातील चक्काजाम करणाऱ्या सांजा येथील आंदोलकांवर पोलीस प्रशासनाने जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 32 जणासह 40 जणावर गुन्हे नोंदवले आहेत.
दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी 11.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे मराठा समाजाच्या आरक्षाणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येणारे जाणारे रोडवर बैलगाडी व ट्रॅक्टर उभे केले. बैलांना डांबरी रस्त्यावर तिन दिवस उन्हात बांधून त्यांना वेदना होतील असा छळ करुन क्रुरतेने वागणुक दिली. आणि बैलगाड्या आडव्या लावून येणारे जाणारे वाहनाना अटकाव करुन मानवाच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत बैल रिकामे सोडले. सर्व रोड बंद करुन चक्का जाम आंदोलन सुरुच ठेवून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-हनुमंत जालींदर म्हेत्रे, वय 36 पोलीस नाईक पोलीस ठाणे आनंदनगर यांनी दि.18. फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 341,283,188 भा.दं.वि.सं. सह म.पो.का. 119,135 सह कलम 11(1)(क) प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.