धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील आठ ही तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रमे राबवून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. 

धाराशिव शहरात सकाळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर धाराशिव शहरात मनोज जरांगे पाटील यांची कन्या व मुलगा यांच्यासह शहरातून बाईक रॅली भव्य प्रमाणात काढण्यात आली. सायंकाळी जिजामाता उद्यान येथून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज चौकात परवार रस्ता रोको करणाऱ्या काही नेत्यांनी आमदार, खासदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येवून महाराजांच्या पुतळ्यास हार घालण्यास येवू नये असा इशारा दिला होता. त्यामुळे शिवजयंती असतानाही एकही आमदार, खासदार अथवा नेता छत्रपती शिवाजी महाराज चौकात फिरकले नाही.


 
Top