भूम (प्रतिनिधी)-भूम .येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये युवा सेनेची युवकांची फौज तळागाळापर्यंत पोहोचून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीचा निपटारा केला पाहिजे. तसेच जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी युवकांनी संघटन मजबूत करून,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व तसेच खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे असे आवाहन युवासेना जिल्हा संपर्क प्रमूख किरण लोहार यांनी केले आहे .

भूम येथील शासकीय विश्रामगृहामध्ये युवासेना प्रमुख  आदित्य ठाकरे व युवा सेना सचिव वरून सरदेसाई  यांच्या आदेशाने व तसेच जिल्ह्याचे खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेनेची भूम- परांडा- वाशी आढावा बैठक व मार्गदर्शन शिबिर युवा सेनेचे राज्य विस्तारक  किरण लोहार  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिंकेपर्यंत लढण्याची संधी युवकांनी सोडू नये,यासाठी युवकांनी समाज कार्य करून पुढे याव असे आवाहन युवा सेना राज्य विस्तारक  किरण लोहार यांनी केले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख डॉ चेतन बोराडे, विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, उपजिल्हा प्रमुख उमेश जाधव, युवासेना तालुका प्रमूख सुधिर ढगे , परांडा तालुका प्रमूख शिवाजी देवकर, गोविंदराज शाळू, विधानसभा चिटणीस, अजित तांबे तालुका संघटक, प्रतिक रणदिवे तालुका समन्वयक, प्रतिक महामुनी वाशी शहर प्रमुख , दत्ता चौधरी ,युवा सेना शहर प्रमुख आविनाश जाधव, परांडा शहर युवा आधिकारी कुणाल जाधव, गणेश चोबे, गणेश डमरे, बालाजी दुधाळ, अजय कोकाटे, प्रमोद ढगे, राहूल देवकते, प्रविण भोसले, अक्षय माळी, विनोद रेडे, शंकर गपाट अशोक पन्हाळे, हनुमंत सानप, संजय पाटील, वैभव जगताप, सप्नील बस्वेकर यांच्या सह युवासैनिक उपस्थित होते.

 

 
Top