तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद उर्द्रू प्रशालेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक मौला शेख यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले.                                   

परभणी येथे 28 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य उर्दू्‌ शिक्षक संघटना परभणी व झैन फाउंडेशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद उर्दू प्रशालेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक  मौला शेख यांना माजी शिक्षण मंत्री.डॉ. फौजिया खान  यांच्या हस्ते राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.या वेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष एम.ए.गफ्फार , धाराशिव जिल्हा अध्यक्ष तय्यबअली शहा , जिल्हा सचिव नईमुद्दिन सय्यद उपस्थित होते.


 
Top