तुळजापूर (प्रतिनिधी)-हॅलो मेडिकल फाउंडेशन, युरोपियन युनियन व स्विस एड यांच्या संयुक्त विद्यमाने निर्धार समानतेच्या प्रकल्पाअंतर्गत हिंसा मुक्त गाव व हिंसा मुक्त कुटुंब अभियान घेण्यात आले. यावेळी प्रामुख्याने महिला व मुलीवर होणारे कौटुंबिक, सामाजिक हिंसा, बालविवाह, हुंडा सारख्या रुढी परंपरा भेदभाव कमी करण्यासाठी हिंसेला प्रतिबंध करण्यासाठी महिला,पूरुष, युवक, युवती यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी सभापती प्रकाश चव्हाण, सरपंच सुर्यकांत चव्हाण, शिवाजी चव्हाण पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, नेमिनाथ चव्हाण, सुभाष नाईक,माजी सरपंच ज्योतीका चव्हाण ग्रामपंचायत सदस्य शांताबाई राठोड, कांताबाई पवार, कमळाबाई राठोड, उपस्थित होते.या मान्यवरांच्या हस्ते गावातील आदर्श जोडपे म्हणून संतोष चव्हाण, वंदना चव्हाण, सतिश राठोड,काजल राठोड, संतोष राठोड, अनिता राठोड,बाबु पोमा राठोड,सुमन राठोड या दांपत्याचे सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमास शिवाजी चव्हाण, माणिक राठोड, यशवंत राठोड, रेखु राठोड, रेवापा राठोड, शंकर चव्हाण, हरिदास राठोड, सुनील राठोड, केशव चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण, सुधाकर राठोड, सुभाष चव्हाण, हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या समुपदेशिका वासंती मुळे, समन्वयक नागिनी सुरवसे, पर्यवेक्षिका इंदुबाई कबाडे, पर्यवेक्षक श्रीराम जाधव,प्रेरिका सुरेखा चव्हाण,प्रेरक अरुण चव्हाण यांच्या सह गावातील महिला पूरुष युवक युवती मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top