धाराशिव (प्रतिनिधी)-अधिवेशनामध्ये सगेसोयऱ्यांचा अध्यादेश न काढल्यामुळे आणि एक दिवशीय अधिवेशनात मुळ मागणी बाजूला ठेवून दुसरीच मागणी मंजूर केली आहे. त्याप्रमाणे मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झालेत ते मागे घ्या या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

मोर्चामध्ये महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येवून मोर्चेकरांनी जिल्हाधिकाऱ्यांन मागण्यांचे निवेदन दिले. पत्रकारांशी बोलताना ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मुळ मागणी असताना वेगळीच मागणी मान्य केली. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश पास केला नाही. आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यामुळे पुढील आंदोलन जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात येईल. असे सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले. 


 
Top