धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे गुरुवारी (दि.1) जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यामध्ये लोहारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी नरदेव कदम (मार्डी) यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी जिल्ह्याचे नेते संजय निंबाळकर यांच्या हस्ते तालुकाध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले. 

देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे विचार व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनामजबूत व वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या पाठीशी राहील असे आवाहन याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केले. याप्रसंगी संजय निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम जिल्हाभर सातत्याने चालू असून आगामी काळामध्ये पक्ष बळकट होऊन पक्षाला चांगले दिवस येतील, असे सांगितले. याप्रसंगी लोहारा येथील ज्येष्ठ राजेंद्र कदम यांचाही सत्कार करण्यात आल. याप्रसंगी मुबारक गवंडी, नवाज सय्यद, सुनील ठेले, पिंटू रसाळ, मिलिंद नागवंशी, किशोर कदम, अण्णासाहेब कदम, दगडू लोभे, राजेंद्र लोमटे, उत्तम नरगाळे, हरिभाऊ भालेराव, संजय सुर्यवंशी, बालाजी भोकरे, अनिल जाधव, बालाजी डोंगे, भारत शिंदे, लक्ष्मण जाधव, शिवाजी सावंत, रमेश देशमुख, प्रवीण शिंदे, विठ्ठल माने, जीवन बर्डे, नानासाहेब जमदाडे, बाळासाहेब कणसे, बाळासाहेब जाधव, दत्तात्रेय जाधव, किशोर आव्हाड, मनोहर हारकर आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top