धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव (दि.2) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग धाराशिव जिल्ह्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचा नवी मुंबई येथे दिनांक 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी ही पूर्वनियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विभागाचे सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.धाराशिव जिल्हा मधून जाणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांची माहिती घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे तसेच राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई शेख यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले. धाराशिव जिल्हा मधून अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे व अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष असद खान पठाण  यांनी उपस्थितांना केले. आज मुस्लिम समाज राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या सोबत भक्कमपणे उभा आहे. कारण अजित पवार यांनी घेतलेले मुस्लिम समाजाप्रती निर्णय यामुळे मुस्लिम समाज नेहमी अजित पवार यांच्यासोबत राहील असे यावेळी सांगण्यात आले.

तसेच नळदुर्ग चे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते शफीभाई शेख यांची अल्पसंख्यांक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे व अल्पसंख्याक विभाग  यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे धाराशिव  तालुका सरचिटणीस पदी प्रकाश बालकुंदे व बेंबळी शहराध्यक्षपदी अतिश मरगणे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे आदिवासी सेल च्या जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल कुमार शिंदे, विक्रम काळे, धाराशिव तालुका अध्यक्षपदी सिद्धेश्वर काळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी जितेंद्र काळे, वाशी तालुकाध्यक्षपदी विशाल काळे यांची धाराशिव तालुका अध्यक्ष प्रशांत फंड, भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मलंग शेख, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई शेख, व आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी यांचे उपस्थित यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्यासोबत अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष असद खान पठाण,अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस खलील पठाण, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष महंमद हाजी अबुबकर कोतवाल,ज्येष्ठ नेते समियोद्दीन मशायक,परंडा शहराध्यक्ष जावेद गौस खां पठाण, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज पठाण, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुहास मेटे,धाराशिव युवक शहराध्यक्ष निहाल शेख, परंडा अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष जहांगीर गौस शेख, कळंब अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष अतिक पठाण,धाराशिव अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी,

धाराशिव अल्पसंख्यांक शहर कार्याध्यक्ष  समीर खतिब,धाराशिव तालुका संघटक कलीम शेख,तुळजापूर विद्यार्थी तालुकाध्यक्ष सोहेल बागवान,केशेगाव जि.प.गटप्रमुख लिंबराज लोखंडे,अशोक रणदिवे, संतोष काळे, मालाजी चिमाजी देशमुख, अजय पवार, मोहसीन इनामदार,आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी उपस्थित होते.


 
Top