उमरगा (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूल ला 1983 च्या बचचे पुणे येथे अभियंता असलेले विद्यार्थी शिवाजी साबणे यांनी संगणक तर डी वाय पाटील येथे अभियंता असलेले डॉ मिलींद मंठाळकर यांनी प्रिंटर भेट दिला.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक बाबुराव कांबळे अभियंता संजय सरपे,लोहार्याचे विस्तार अधिकारी व शाळेचे माजी विद्यार्थी सुभाष चव्हाण भारत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले हरी पाचंगे, क्रीडा शिक्षक अमजद बेग,सिजाऊद्दीन लंगडे, सुनिल जाधव,राम गायकवाड उपस्थित होते.यावेळी मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे सुत्रसंचलन शिल्पा चंदनशिवे तर आभार बलभीम चव्हाण यांनी मानले.यावेळी धनराज तेलंग संजय रुपाजी, बशीर शेख उपस्थित होते.
समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त मदत केलेली आहे.आज शिवाजी साबणे व मिलिंद मंठाळकर यांनी संगणक व प्रिंटर देऊन इतर माजी विद्यार्थ्यांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.इतर विद्यार्थ्यांनी ही पुढे येऊन शाळेला मदत करावी असे आवाहन मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी केले आहे.