तुळजापूर (प्रतिनिधी)-संभाजी ब्रिगेड धाराशिव जिल्ह्याच्यावतीने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्याजळकोट ता.तुळजापुर येथील राहुल किसन जाधव यांचे कुटुंबियांना दहा लाख रुपयाची शासकीय मदत अवघ्या अडीच महिन्यात संभाजी ब्रिगेड जिल्हा शाखा धाराशिव ने शासन दरबारी पाठपुरावा करुन मिळवुन दिली.
राहुल जाधव ने मराठा आरक्षणसाठी 21 नोव्हेंबर 2023 ला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर त्याला मुखमंञी सहायत्ता निधीतुन दहा लाख रुपयाची अर्थिक मदतीचा चेक 6 फेब्रुवारी 2024 ला काढण्यात आल. यासाठी जिल्हाध्यक्ष शरद पवार, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष तुळजापुर समाधान सरडे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष लोहारा बालाजी यादव सह अनेकांनी परिश्रम घेतले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जळकोट ता.तुळजापुर येथील राहुल किसन जाधव यांस मदत मिळवुन देण्यासाठी निवेदन देवुन त्याचा पाठपुरावा केल्याने याची दखल शासनास घ्यावी लागली. 10 लाख रुपये मदत तात्काळ कुटुंबीयांना मिळवून देण्यात संभाजी ब्रिगेडने प्रयत्न करून मंजूर करून घेण्यास यश मिळवले आहे. परत एकदा शासनाला पत्र लिहून पाठपुरावा करून कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये घेण्याचे विनंती करणार असल्याची माहीती जिल्हाअध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.