धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसनजी मुश्रीफ यांना मुंबई येथील कार्यालयात येथे भेटून सविस्तर चर्चा करून इंटनशिपमध्ये काम करत असलेल्या डॉक्टर्स यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन दिले.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर्स म्हणून इंटनशिप मध्ये काम करत असताना शासनाच्या वतीने अतिशय कमी मानधन दिले जाते. इंटनशिप मधील डॉक्टर्स यांच्यावर कामाचा  भरपूर ताण व लोड असतो त्या तुलनेत अतिशय कमी मानधन दिले जाते. इंटनशिप मधील डॉक्टर्स हे बहुतांशतः सर्वसाधारण व गरीब कुटुंबातील असून त्या मानधनात त्यांचा खर्च (उदरनिर्वाह) सुद्धा भागत नाही. सविस्तर चर्चे नंतर माननीय मंत्री महोदय हसन मुश्रीफ यांनी असा शब्द दिला की, सध्याच्या मानधनांमध्ये दहा हजार रुपयाची वाढ करून दरमहा 21 हजार रुपये मानधन देण्यात येईल व याची कार्यवाही शासन स्ततरावरून लवकरात लवकर करण्यात येईल. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील इंटनशिप करणाऱ्या डॉक्टर्स यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी मुंबई येथील कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या सोबत भूम-परंडा-वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप उपस्थित होते.


 
Top