तुळजापूर (प्रतिनिधी) - शहरातील पापनाशगर परिसरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा प्रारंभ बुधवार दि. 31 जानेवारी रोजी  झाला होता. याचा सांगता बुधवार दि. 7 फेब्रुवारी रोजी काल्याचे किर्तन हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज मेडसिंगा यांचे काल्याचे किर्तनाने झाली. कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात येवुन झाला. 

या सप्ताहात हभप प्रमोद महाराजमाने, अनसुर्डेकर, हभप. गायनाचार्य अरूणश महाराज शिंदे (तुळजापूर) गायनाचार्य सुनित महाराज बगे, काटी  ह.भ.प.लक्ष्मण महाराज चौगुले, ह.भ.प. कु. राधाताई पंदुरे महाराज अमृतवाडी, ह.भ.प.अशोक महाराज यादव, तुळजापूर, भागवताचार्य ह.भू.प. गणेश महाराज काळे, नागपूर  यांच्या झालेल्या किर्तनास मोठा प्रतिसाद मिळला. बुधवार दि 7 रोजी काल्याचे किर्तन हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज मेडसिंगा किर्तननंतर काल्याचा महाप्रसाद कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे यांच्या वतीने  करण्यात येवुन या सप्ताह सोहळ्याचा सांगता झाला. या सोहळा यशस्वीतेसाठी  पापनाश नगर विवेकानंद मिञमंडळ तुळजापूर यांनी परिश्रम घेतले.


 
Top