भूम (प्रतिनिधी)-बार्शी-जामगाव रोडवरील रेणुका मंगल कार्यालयाजवळ भीषण अपघाताची घटना घडली. त्यामध्ये, लातूरकडून पुण्याकडे जाणारी शिवशाही बस व  दुचाकीची दुपारी 1 वाजताच्या सुमारास धडक बसली आहे. (एम एच 25 एसी 6937) या दुचाकीवरील भूम तालुक्यातील रामेश्वर येथील 2 युवक ठार झाले. दत्ता सोमनाथ गुजर (30) आणि सलीम जब्बार शेख (29) दोघे राहणार रामेश्वर ता. भूम, जि. धाराशिव, अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी स्थानिक व पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामा करण्यात येत आहे. सदर घटनेमुळे तालुक्यातील रामेश्वर गावावर शोककळा पसरली आहे.


 
Top