कळंब (प्रतिनिधी)- मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाचे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेनुसार राज्यासह मराठवाड्यात सर्वेक्षण सुरू आहे . मराठा कुटुंबाचा कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी प्रत्येक दारोदारी जाऊन सर्वेक्षकाने सर्वेक्षण करणे अपेक्षित आहे .मात्र तालुक्यातील अनेक कुटुंब सर्वेक्षणातून वंचित आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने दिनांक 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत सदरील सर्वेक्षणास मुदतवाढ दिली असताना देखील तालुक्यातील अनेक गावातून सर्वेक्षण बंद केल्याची चित्र दिसत आहे. तरी आपणास विनंती की, आपण हे सर्वेक्षण चालू ठेवावे वंचित राहिलेल्या मराठा कुटुंबाचा सर्वे करून घ्यावा.तसेच अनेक ठिकाणी मराठा समाजाची माहिती सविस्तर भरावी लागत असल्यामुळे सर्वेक्षक मराठा कुटुंबाला टाळत असल्याचे निरीक्षणात आढळून आले आहे .कृपया अशा पद्धतीने सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी ही मागणी केली आहे. यावेळी सकल मराठा समाज बांधव कळंब उपस्थित होते. 


ग्रामपंचायत डिकसळ हद्दीतील जिजाऊनगर भाग अद्याप सर्वेक्षणापासून वंचित आहे. आज पर्यंत एक ही प्रगणक या भागाकडे सर्वेक्षणासाठी फीरकलेला नाही.

तसेच कळंब न.प.हद्दीतील दत्तनगर मधील पण कांही भागात प्रगणक पोहचलेले नाहीत.


 
Top