तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिरात पुजा करण्याचा कारणावरुन नाशिकच्या भाविकांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सहा जणांविरोधात भाविकांनी दिलेल्या तक्रार वरुन गुन्हा नोंद केला आहे. सदरील हाणामारीची घटना बुधवार दि. 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 03.46 वाजता घडली.

या बाबतीत अधिक माहिती अशी की, राजेंद्र नरहारी पिंगटे, वय 60 वर्षे, रा. जयभवानी रोड शंकर नगर नाशिक रोड नाशिक ता. जि. नाशिक यांना व त्यांचे सोबतचे लोकांना श्री. तुळजाभवानीचे मंदिरात पुजा करण्याचे कारणावरुन कदम पुजारी व सोबतच्या पाच अनोळखी लोकांनी परमेश्वर लाँज समोर आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. भाविकाने दिलेल्या तक्रारी वरुन पोलिसांनी वरील सहा जणांविरोधात तुळजापूर पोलिस ठाणे येथे कलम 143, 147, 324, 323, 504, 506, 427 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 
Top