तेर (प्रतिनिधी)-इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या  शिष्यवृत्ती परीक्षेचा सन 2023-2024 चा निकाल जाहीर झाला असून धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील एकूण 25 विद्यार्थी पात्र झाले आहेत.

यामध्ये कु श्रद्धा तानाजी वराळे 139 गुणांसह प्रथम,कु कोकरे प्राची बबन 134 गुणांसह द्वितीय, कु हेगडकर प्रिया हनुमंत 124 गुणांसह तृतीय, कु भोंडवे अमृता मोहन 119 गुणांसह चौथी,चि फंड वेदांत बाळासाहेब 112 गुणांसह पाचवा, कु आंधळे रिद्धी बालाजी 109 गुणांसह सहावी, कु. पांढरे राजनंदिनी विकास 95 गुणांसह सातवी आली आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांना  बळवंतराव एस. एस. ,  कांबळे बी. डी., रणदिवे एन. डी., देवकते एन. एम ., वर्गशिक्षक  गोडगे एस. यु. यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक बेदरे जे के, सुपरवायझर सुशीलकुमार पाटील, बळवंतराव एस एस, गोडगे एस .यु, रघुनंदन पुजारी, अविनाश पाडुळे, बापू नाईकवाडी, नामदेव कांबळे, किरण अबदारे, हनुमंत हेगडकर, एजाज बागवान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 
Top