तुळजापूर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या शिवजयंती उत्सवाला राजकिय झालर  प्राप्त झाल्याचे दिसुन आले.

विशेषता महाविकासआघाडी व महायुती समर्थक शिवजन्मोत्सव समित्यांनी मोठ्या उत्साहात आपआपल्या नेत्यांना बोलवुन छञपती शिवाजी महाराज मुर्ती प्रतिष्ठापना व मिरवणूक कीला बोलवुन आपआपल्या पक्षाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत असल्याचे मतदारांपुढे दाखवून दिले.

महाविकास आघाडी नेत्यांचा भरणा असलेल्या आर्य चौक, जाणता राजा शिवजन्मोत्सव मंडळाने भव्य असे मोफत आरोग्य शिबीर घेतले व भव्य अशी शिवजयंती सांगता सोहळ्याच्या मिरवणूकीचा शुभारंभ  महाविकासआघाडी नेते माजी आ. मधुकर चव्हाण आजारी असल्याने त्यांच्या ऐवजी खा. ओमराजे यांच्या हस्ते करुन मिरवणूक काढुन शिवजयंती सोहळा साजरा केला. तर गोलाई शिवजन्मोत्सव  मंडळाने भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शिवमुर्ती प्राणप्रतिष्ठापना करुन रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक काढून शिवजयंती सोहळा साजरा करुन लोकसभा निवडणुक पार्श्वभूमीवर   महाविकास आघाडी, महायुतीने तोडीस तोड प्रचार यंञणा राबविलीचे दिसून आले.

श्रीसंत रोहीदास जयंती दिनी भवानी रोडवर शिवसेना खा. ओमराजे निंबाळकर व भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आपआपल्या समर्थकांसह  वेगवेगळ्या वेळात येवुन संत रोहीदास महाराजांना अभिवादन केले. एकंदरीत लोकसभा निवडणुक पार्श्वभूमीवर यापुढे महामानव यांच्या जयंतीला नेते आवर्जून उपस्थितीत राहुन अभिवादन करुन आपआपल्या पक्षाचे अस्तित्व दाखवणार असल्याचे स्पष्ट होते.


 
Top