तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील भांतब्री येथे तहसिलदार यांच्या उपस्थितीत करुन दिलेला शेतरस्ता  गेल्या दोन चार वर्षापासून पुन्हा अतिक्रमण   विळख्यात सापडल्याने शेतकरी ञस्त झाला आहे.

मागील दोन वर्षापासून  हा  शेतरस्ता अतिक्रमण मुक्त  मोकळा करण्यास प्रशाषणाला अपयश येत आहे. भातंब्रा येथील  गटनंबर   59 व  60 या गटातील शेतकऱ्यांने अतिक्रमीत केल्याची  तक्रार शेतकरी शिवाजी दांगट यांनी केली होती. तात्कालीन तहसिलदार सौदागर तांदळे यांनी बांधावर बसून सन 2021 रोजी  शेतरस्ता तयार करून दिला होता. मात्र संबंधित शेतकऱ्यांने तीन महिन्याच्या आत त्यावर अतिक्रमण  केले आहे. तेआजतागायत तसेच आहे.विशेष म्हणजे   या या शेतरस्तास संमति दिली होती. आणि आत्ता विरोध करीत अतिक्रमण केले आहे. शेतरस्ता खुला करून देण्यासाठी  तीन ते चार वेळेस पथक तिथे गेले पण  रिकाम्या हाताने परत गेले. यात प्रशासनाचा अमूल्य वेळ वाया गेला हा वेळ वाया घालवणाऱ्यावर प्रशासन पोलिस कारवाई करण्यास का टाळाटाळ करीत आहे हे समजू शकले नाही. आतातरी महसूल, भूमिअभिलेख कार्यालय मोजनी करून शेतरस्ता खुला करून देणार का ? पुर्वी प्रमाणेच वादग्रस्त शेतरस्त्याचे गुऱ्हाळ असेच चालू राहणार का ? असा सवाल त्रस्त शेतकऱ्यातून विचारला जात आहे. .शेतरस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी येत्या आठ दिवसात भुमिलेख कार्यालयाचे  अधिकारी व पोलीस बंदोबस्तातात शेतरस्ता मोकळा करणार असे भुमिलेख येथील कर्मचाऱ्याने सांगितले.


 
Top