धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव मध्ये भोसले हायस्कूलच्या प्रांगणात फ्लायिंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल आयोजित भव्य दिव्य असा धाराशिव ज्युनियर टॅलेंट सर्च नामक विज्ञान प्रदर्शन सोहळा  पार पडला. या मध्ये शहरातील अनेक नामांकित शाळांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रामुख्याने ग्रीन लँड, भोसले हायस्कूल, छत्रपती हायस्कूल, अभिनव हायस्कूल, तेरणा पब्लिक स्कूल, नूतन प्राथमिक विद्या मंदिर, फाउंडेशन,फ्लायिंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, मराठी कन्या प्रशाला आशा एकूण 9शाळांचा समावेश होता. विद्यार्थ्यांचे 160 प्रयोग आले आणि जवळपास 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विज्ञानप्रेमी मंडळी, पालक देखील जवळपास 300 च्या संख्येने उपस्थित होता.यांचा समावेश होता.

विज्ञान प्रदर्शनाचे उदघाट हे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील व फ्लायिंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या डायरेक्टर डॉ. मंजुळा आदित्य पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भोसले हायस्कूलचे प्राचार्य साहेबराव देशमुख, तेरणा पब्लिक स्कूल च्या प्राचार्य जयश्री दिगंबर चौधरी या उपस्थित होत्या. कार्यक्रमास परीक्षक म्हणून प्रा. संतोष देशमुख, श्र्युीत आंबेवाडीकर, प्रकाश घुगे लाभले.

या स्पर्धेत यशवंत कुंडकर, अविराज पाटील, समृद्धी देशमुख यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवले तर उत्तेजनार्थ पारितोषिक वैष्णवी देवी दर्फळकर, अनुष्का देशमुख, वैभवी पवार, स्वरा शिंदे, मृण्मयी गोरे यांना मिळाले. या प्रदर्शनात चंद्रद्रयान, पर्यावरण पूरक उपक्रम, सोलार एनर्जी उपक्रम, इत्यादी अद्यावत उपक्रमांचा समावेश होता.या कार्यक्रमात अनेक बालगोपाल वैज्ञानिकांनी सहभाग घेतला. तसेच परिसरातील विज्ञान प्रेमी मंडळींनी देखील कार्यक्रमास उपस्थिती नोंदवली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती कदम तर सूत्रसंचालन विज्ञान विभाग प्रमुख विनोद बडवे यांनी केले.


 
Top