धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे साजरी करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यात आले.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यातून अवघ्या महाराष्ट्राला स्वाभिमान, आत्मभान, ओळख, अस्मिता लढाऊपणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली. त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेत आज गेली चार शतक महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात आपल्या पराक्रमाची पताका फडकवित आहेत. आपल्याला प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्रभर स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा राजा या संकल्पने पासून प्रेरणा घेतली आहे.येणाऱ्या पिढीला महाराजांचा शौर्य, धैर्य, पराक्रम, आदर्श राज्यकारभाराची माहिती व्हावी त्यांना आपला इतिहास कळावा, त्यातून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीत त्यांनी सहभागी व्हावे ही स्वराज्य सप्ताह साजरा करण्यामागील पक्षाची भूमिका आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्यासोबत धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, धाराशिव महिला तालुकाध्यक्ष रंजना ताई भोजने,जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश नलावडे,अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस खलील पठाण, सामजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,ओबीसी जिल्हा सचिव नारायण तूरुप, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सागर गाढवे,शहर सचिव सुजित बारकुल, केशेगव जि.प गट प्रमुख लिंबराज लोखंडे, अंबेजवळगा जि.प गट प्रमुख सुरेश राठोड उपस्थीत होते.


 
Top