धाराशिव (प्रतिनिधी) - भारतीय जनता पाटीचे जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य पाटील यांचा वाढदिवस रविवारी (दि.18) जिल्हाभर विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. श्री. चालुक्य यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांसह विद्यार्थ्यांना फळे, वसतीगृहासाठी किरणा वस्तू, मोफत गॅस कनेक्शन, विद्यार्थ्यांना अल्पोपहार, टीशर्ट, मुलींना ड्रेस, महिलांना साडी वाटप यासह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. 

जिल्हाध्यक्ष श्री. चालुक्य यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरातील महिला रुग्णालय व कुष्ठधाम येथे रुग्णांना व मुकबधीर, मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आली. गणेश नगर भागातील पालावरच्या कुटुंबियांना गृहपयोगी साहित्य व जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रदेश सदस्य खंडेराव चौरे, प्रवीण पाठक,  जिल्हा सरचिटणीस इंद्रजीत देवकते, जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर, मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, शहराध्यक्ष आबा इंगळे, संदीप इंगळे विनोद निंबाळकर, पुष्पकांत माळाळे, स्वप्निल नाईकवाडी, ओम नाईकवाडी, हिंमत भोसले, प्रसाद मुंडे, धनराज नवले, सूरज शेरकर, रोहित देशमुख, सुनील पंगुडवाले, अमोल राजेनिंबाळकर, सार्थक पाटील आदी उपस्थित होते.  सुरतगाव येथील विटभट्टी कामगारांच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र असलेले टी शर्ट, मुलींना डेस व खाऊ वाटप करण्यात आले. लोहारा तालुका भाजपाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, उपसरपंच दिनकर जावळे पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष संजीवनी पाटील, उपाध्यक्षा अश्विनीताई श्रीकांत पाटील, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, डॉ.सुनिल मंडले, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, दिलीप पवार, प्रसिद्धी प्रमुख निकेश बचाटे, प्रदिप बापु पाटील, शरद पाटील, सोमनाथ वडगावे, नाथ फुलसुंदर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.भूम येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तसेच मूकबधिर शाळेत विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आली.वसतिगृह पाथरुड येथे मोफत गॅस कनेक्शन व महिनाभर पुरेल एवढा किराणा व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.  लोकसेवा वसतिगृह ईट फळे वाटप करण्यात आली.ईट येथील रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.यावेळी परंडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, जिल्हा चिटणीस अंगद मुरुमकर, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, सरचिटणीस संतोष सुपेकर आदी उपस्थित होते. परंडा येथे दिव्यांग व्यक्तीना ज्येष्ठ नागरिकांना साहित्य  व फळवाटप तसेच ग्रामीण रुग्णालयात रुग्णाना फळवाटप करण्यात आले. यावेळी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सूर्यवंशी, सरचिटणीस विकास कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देविजींना महाआरती करण्यात आली. तसेच गरजु महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.यावेळी बाजार समिती सभापती सचिन पाटील,प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे, भाजप नेते नागेश नाईक, महिला प्रदेश सदस्या मीनाताई सोमाजी, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मलबा, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद  कंदले, विकास मलबा, शहराध्यक्ष शांताराम पेंदे आदींची उपस्थिती होती.एकुरगावाडी येथील मतिमंद, अनाथाश्रम येथे विद्यार्थ्यांना अल्पोपहार व फळे वाटप करण्यात आली.  यावेळी विधानसभा विस्तारक सिध्देश्वर माने, तालुका सरचिटणीस महादेव सलके, सागर पाटील आदी उपस्थित होते.कळंब येथील मुकबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांना खाऊ व फळे वाटप करण्यात आले. यावेळी युवा मोर्चाचे संताजी वीर, मकरंद पाटील, प्रकाश भडंगे आदींची उपस्थिती होती.वाशी येथील  ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना  फळे वाटप करण्यात आली.  तालुकाध्यक्ष  राजगुरु कुकडे, शहराध्यक्ष बळवंतराव  कवडे, उपाध्यक्ष  विलासराव देशमुख, सुहास  कवडे, सुहास  चौघुले, नानासाहेब  कवडे, नगरसेवक  संतोष  गायकवाड, रणजित कवडे आदींची उपस्थिती होती.


 
Top