परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रा. डॉ. गजेंद्र रंदील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी डॉ हरिश्चंद्र गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित उपस्थितांना मार्गदर्शन केले.मनोगत व्यक्त करताना डॉ. हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रत्येक महाराष्ट्रातील व देशातील लोकांनी आत्मसात केले पाहिजेत.त्यांच्या विचाराची सध्या खुप गरज आहे. सध्याचा तरुण हा विविध व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक तरुण दिशाहीन झालेले आहेत. तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केवळ नाचणे आणि एकाच दिवशी त्यांचे गुणगान गाणे यापेक्षा त्यांचे विचार आत्मसात केल्यास व त्यासाठी सुज्ञ सुशिक्षित लोकांनी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून तो आपल्या विद्यार्थ्यांना सांगितला पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. यासाठी विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवाजी महाराज यांचे कार्य प्रकट केले ते तरुण पिढीला सांगितले पाहिजेत. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे प्रा. डॉ. बाळासाहेब राऊत, प्रा. डॉ. संतोष काळे, कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दिवाने, शिक्षकेतर कर्मचारी बाबासाहेब शिरसागर, सेवानिवृत्त बबन ब्रह्मराक्षस, उत्तम माने, भागवत दडमल, दत्ता आतकर, श्रीमती सुनंदा, कोठुळे आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले. तर डॉ. बाळासाहेब राऊत यांनी आभार मानले.


 
Top