तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर-सोलापूर महामार्ग रस्त्यावर असणाऱ्या तामलवाडी परिसरातील रस्त्यावर महामार्ग पोलिसांकडून खाजगी वाहनातून आलेल्या भाविकांना वाहन परवाना, पीयुसी आदी विविध कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली विनापावती आर्थिक लूट होत असल्याची तक्रारी भाविकांमधुन येत आहेत.

श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन तिच्या चरणी दक्षणा ठेवण्याऐवजी मराठवाड्याच्या प्रवैशध्दारावर पोलिसांचे दर्शन घेवुन त्यांना दक्षणा देवुन मगच श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ जावे लागत असल्याची खंत भाविकांमधुन व्यक्त केली जात आहे. महामार्ग पोलिस हे रस्ते सुरक्षेसाठी का भाविकांकडुन पैसे वसुली करण्यासाठी तैनात केले गेले आहेत असा संतप्त सवाल केला जात आहे.

तामलवाडी टोलनाक्याच्या पुढे सोलापूर-पुणे-मुंबईसह, कर्नाटक, आंध्रातून अनेक भाविक सोलापूर-तुळजापूर महामार्गावरून तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी  खाजगी वाहनातुन ये जा करणारी वाहने अडवले जातात.येथे ...लायसन आहे का....पीयुसी...इन्शुरन्स पेपर वगैरे विचारतात...सर्वच पेपर क्लिअर असले तरी हेड लाईट लावा...ब्रेकलाईट चालू आहेत का?...आदींची पाहणी केली जाते. यातील एखाद्या तरी गोष्टीत कमतरता भासली की, ऑनलाईन दंड मारण्याची भीती दाखविली जाते. नंतर तडजोड करुन शंभर रुपये पासुन पाचशे रुपये घेऊन वाहने सोडले जातात. खाजगी वाहन चालक या इंट्रीचे पैसे  भाविकांकडुन वसुल करतात. तरी भाविकांची ही अर्थिक लूट थांबविण्यासठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालुन ही अर्थिक लूट प्रथा बंद करण्याची  मागणी होत आहे.


 
Top