उमरगा (प्रतिनिधी)-तालुक्यातील तुरोरी येथील निलुनगर तांडा येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उमरगा लोहारा विधानसभा निवडणूकिची तयारी करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

याप्रसंगी पहिली ते चौथी मधील जिल्हा परिषदेच्या मुला-मुलींना सातलिंग स्वामी यांच्या तर्फे गणवेशाचे वाटप त्यांच्याच हस्ते करण्यात आले. तसेच सेवालाल मंदिरास पाच सिलिंग फॅन भेट देण्याचे जाहिर केले. याप्रसंगी तुरोरीच्या सरपंच सौ. मयुरी नितीन जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. सदर प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सौ. संगीता सुनील राठोड, सेवालाल मंदिराचे पुजारी सुनील राठोड, सचिन राठोड, रोहिदास राठोड, दिगंबर राठोड, राजू राठोड, सुहास राठोड, सुनील राठोड, रमेश राठोड आदींसह शालेय विद्यार्थी, बहुसंख्य बंजारा समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.


 
Top