धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना मैदनात उतरली असून, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवार दि. 7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ढोकी येलि तेरणा साखर काखान्यावर शिवसैनिकांचा भव्य मेळावा आयोजित केला असून, तयारीसाठी दि. 2 फेब्रुवारी रोजी कार्यकर्त्यांची बैठक कारखान्यावर पार पडली.

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून, महिनाभरात कधीही आचारसंहिता घोषित होवू शकते. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली तेरणा साखर कारखान्यावर दि. 7 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचा धाराशिव लोकसभा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत राहून मार्गदर्शन करणार आहेत. दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक कारखाना स्थळावर भैरवनाथ समुहाचे अध्यक्ष व शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी संपर्कप्रमुख अनिल खोचरे, अमरराजे परमेश्वर, किरण गायकवाड, जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे, मोहन पनुरे, दत्ता साळुखे, महिला जिल्हाप्रमुख भारतीताई पाटील, अर्चनाताई दराडे आदी उपस्थित होते.


 
Top