धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी धाराशिव तालुक्यातील केशेगाव गावचे भारत (आप्पा) डोलारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीपत्रकाद्वारे ही नियुक्ती जाहीर केली.
जिल्ह्याचे नेते आ.राणाजगजितसिंह पाटील व भाजप जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य यांच्या हस्ते भारत डोलारे यांचा सत्कार करुन भाजपा जेष्ठ नेते मिलिंद पाटील, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजभाऊ पाटील, भाजयमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजपा कार्यकारिणी सदस्य युवराज नळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
भारत डोलारे हे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे खंदे समर्थक असून आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे ते विश्वासू समजले जातात. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्व सामान्यातून वर आलेल्या भारत डोलारे यांना समाजकारणाचा तसेच पक्षीय कार्याचा दीर्घकालीन अनुभव आहे. ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशा अनेक पदांवरून गेली 30 वर्षे काम केले आहे. ग्रामीण भागातील क्षेत्रासह, शेती, सामाजिक व महिलांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन दि.1 फेब्रुवारी 2024 ला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीवर त्यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून संघटनात्मक नियुक्ती केली आहे. भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे, विचार, लोकप्रिय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या पदाचा उपयोग करणार असल्याची व मिळालेल्या संधीला नक्कीच न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही सत्कारावेळी नुतन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारत डोलारे यांनी दिली.
यावेळी या सत्कार समारंभास अभय इंगळे, ओम नाईकवाडी, बालाजी शिंदे, प्रा.सोमनाथ लांडगे, प्रा.मनोज डोलारे, श्रीकांत तेरकर, रामेश्वर शिंदे, रतन कोळगे, हरिश्चंद्र डोलारे, रंगनाथ कोळगे, महेश चांदणे, गणेश एडके, गौतम ठेले, शिवाजी गाढवे, तानाजी डोलारे, अमोल नवले, विनोद डोलारे, बाळासाहेब डोलारे व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत डोलारे यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.