धाराशिव (प्रतिनिधी)-शिवजन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील जवळा (खुर्द) येथे हातलाई शुगर प्रायव्हेट लि. या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम व मोळी पूजन आणि शेअर्स विक्री शुभारंभ सोमवारी दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे अशी माहिती हातलाई शुगरचे चेअरमन अभिराम सुधीर पाटील यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास युगांडा देशाचे व्यापार, उद्योग सहकार मंत्री, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज आदी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे नेते सुधीर पाटील, माजी नगरसेविका प्रेमा सुधीर पाटील, तुळजाभवानी बँकेचे चेअरमन संजय पाटील, हातलाई शुगरचे चेअरमन अभिराम पाटील, संचालक आदित्य पाटील, डॉ. मंजुळा पाटील आदींनी केले आहे.


 
Top