नळदुर्ग (प्रतिनिधी)- जीवन जगत असताना आयुष्यात संघर्ष सर्वांच्याच वाट्याला येतो. मात्र संघर्षाचा प्रकार प्रत्येकाचा वेगळा असतो. त्यामुळे आलेल्या संकटावर मात करून त्याच्यातून मार्ग काढणे हे उचित असते असे प्रतिपादन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी एस के फंक्शन हॉल येथे इकरा फाउंडेशन नळदुर्ग व विझन फोर युथ फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने आयोजित करियर गायडन्स ॲन्ड मोटिवेशन सेमिनार प्रसंगी बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून नाशिक येथील मोटिवेशनल स्पीकर आसिफ शेख तर प्रमुख अतिथी म्हणून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, फरीद शेख, ॲड. याकुब शेख, अजीम बेग, मसूद शेख,हाफेज व खारी सय्यद मैनोद्दीन जागीरदार,हाफेज सय्यद  नियामतुल्ला इनामदार,आलेम मोहम्मद रजा, मुख्याध्यापक फजल शेख, निजामोद्दीन इनामदार अझहर जाहगीरदार यांच्यासह इत्यादी जण उपस्थित होते.पुढे बोलताना स्वप्नील लोखंडे म्हणाले की समाजात कसे वागावे याची संस्कृती व संस्कार पालकांनी मुलांवर घडविल्यास एक सुसंस्कृत पिढी समाजात तयार होते त्यामुळे पालकांनी देखील यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

यावेळी मोटिवेशन स्पीकर आसिफ शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की स्पर्धेच्या या युगात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर मोठे लक्ष ठेवून जिद्द व चिकाटीच्या बळावर अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास  हमखास यश संपादन करू शकतात. मात्र त्यासाठी शिक्षकांसोबत पालकांनी देखील आपल्या मुलांवर विशेष लक्ष देऊन त्यांना घडविण्याचे काम करणे गरजेचे आहे.

यावेळी फरीद शेख, ॲड. याकुब शेख, अजीम बेग, मसूद शेख यांच्यासह इत्यादी जणांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता, सय्यद बरकतुल्ला जागीरदार, सय्यद शहा हुसेन इनामदार, आबेद इनामदार, फरहातुल्ला इनामदार, कैसर जागीरदार, दस्तगीर जागीरदार, हामेद पिरजादे यांचा इत्यादी जणांनी परिश्रम घेतले.


 
Top