तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव जिल्हाप्रमुख तथा कळंब धाराशिव मतदार संघाचे आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. 25 फेब्रुवारी रोजी  अपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालय विद्यार्थी वस्तीग्रह येथे साजरा करण्यात आला. या वेळी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाप्रमुख अमीर शेख यांच्या वतीने वही पेन, उन्हापासून बचावासाठी टोपी व पाण्याची बॉटल इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी नरेंद्र आर्य विद्यालयाचे संचालक उमेश भोसले, कल्याण तोडकरी, प्रा. राम गोरे, माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक दीपक थोरात, माजी उपसरपंच दीपक सोनवणे, ग्राप सदस्य सुशांत रोकडे, धर्मराज सरडे, योगेश घोलकर, गणेश कोरे, अर्जुन गोरे, तात्यासाहेब हाके, वस्तीग्रह अधीक्षक ताजुद्दीन सय्यद यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. वस्तीगृहात कार्यक्रम घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला व आमदार पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


 
Top