धाराशिव (प्रतिनिधी)- येथील जे.एफ.अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय, धाराशिव येथे दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी, रोटरी क्लब उस्मानाबादच्यावतीने विविध  क्षेत्रातील  उत्कृष्ट, उल्लेखनीय काम  करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या  म्हणुन डॉ. रोहीणी काचोळे या होत्या. यावेळी त्यांच्या  कार्याबद्दल त्यांचा मानपत्र व  सन्मान चिन्ह  देऊन सत्कार करण्यात आला. तर प्रमुख उपस्थिती डॉ. शिल्पा  दमकोंडवार अधिष्टाथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव व संजय काचोळे हे होते.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट, उल्लेखनीय काम करणाऱ्या एकूण दहा जणांचा गौरव करण्यात आला.  यात मोनिका जयसिंग कवडे, शुभांगी विजय सरवदे, रेबेका आनंद भंडारे, लक्ष्मण भीमराव सिडाम, अश्विनी अमोल जाधव, सूर्यकांत बापूराव घोडके, सीमा रामराजे थोरात, भास्कर निवृत्ती पवार, सोनाली शिवाजी लांडगे, निर्मला वासुदेव कुलकर्णी यांचा समावेश आहे. सदरील कार्यक्रमात सत्कारार्थी व त्यांचे कुटुंबीय, रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक  रोटरी  क्लब अध्यक्षा डॉ. अनार साळुंके यांनी केले. तर सूत्रसंचलन व आभार सचिव डॉ. मीना जिंतूरकर यांनी मानले.


 
Top