धाराशिव (प्रतिनिधी)- धनगर समाजाच्यावतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक येथे धनगर समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

अनुसूचित जातीत समाविष्ट करा ही मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसंच धनगर आणि धनगड एकच नाहीत हे देखील स्पष्ट केलं आहे. राज्यातील आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यापासून वंचित राहिलेला धनगर समाज यामुळे वंचितच राहणार आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कोमल खाटा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे धनगरांना शेड्युल्ड ट्राईब अर्थात आरक्षण मिळणार नाही. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने धनगर समाज बांधव हे आक्रमक झाल्याचा पाहायला मिळालं. दरम्यान धाराशिव मधील अहिल्यादेवी होळकर चौकात समाजातील बांधवांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळला असून यापुढचे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे देखील आंदोलकांनी म्हटले आहे. यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.


 
Top