धाराशिव(प्रतिनिधी)-आधार व पॅन कार्ड वापरून धनीपे ॲप्लिकेशनवरून 1 लाख 34 हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सायबर पोलिसांनी केली.
याप्रकरणी धीरज सोमनाथ सातपुते रा. रूईभर यांनी फिर्याद दिली होती. बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. समीर ईलाही शेख वय 24, रा. रूईभर याने धनीपे ॲप्लिकेशन त्याच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करत त्यात फिर्यादी व इतर साक्षीदारांची वैयक्तिक माहिती त्यांच्या परस्पर भरली. लोकन घेतेवेळी स्वतःच्या नावाचे सीमकार्ड, ईमेल आयडी व सेल्फी लोन खात्यास वापरून 1 लाख 34 हजारांच ऑनलाईन लोन घेतल्याचे निष्पन्न झाले. आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.