कळंब (प्रतिनिधी)- टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीचे ठाणे (मुंबई)प्रतिनिधी व कळंब तालुक्यातील मस्सा (खं) येथील रहिवासी गणेश थोरात यांचे वडील हरिश्चंद्र थोरात यांचे ठाणे (मुंबई) येथील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मुळगावी मस्सा (खं) येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हरिश्चंद्र थोरात यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. यावेळी सर्वच स्तरातील समाज बांधव, नातेवाईक, पत्रकार बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top