तुळजापूर (प्रतिनिधी)-श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त तुळजापुरातील सर्व रिक्षा संघटनांनी उस्फूर्त अशी श्रीराम रॅली काढली होती. या रॅलीमध्ये साधारण पाचशे रिक्षाने सहभाग घेतला होता एक रिक्षा छत्रपती शिवाजी महाराज चौक तर दुसरी रिक्षा आहे पावणारा गणपती येथे होती. अशा प्रकारची रॅली आत्तापर्यंत तुळजापूर येथे झाली नाही. अशा या रॅलीसाठी तुळजापुरातील रिक्षा संघटनांनी मेहनत घेतली आणि याचे फलित म्हणून तुळजापुरातील नागरिकांनी या सर्व रिक्षा बांधवांचा सत्कार केला व ठिकठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात आली. आतिषबाजी आणि श्रीरामाच्या गर्जनेने तुळजापूर दुमदुमून गेले होते.


 
Top