तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील युवास्पंदन सामाजिक संस्था व मराठवाडा सामाजिक संस्था, तुळजापूर यांच्या वतीने श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सव 2024 निमित्त रविवार दि. 21 रोजी सकाळी 10 वा. वक्तृत्व स्पर्धेत आरंभ होणार आहे.  ही स्पर्धा इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावीपर्यंत एकूण तीन गटात राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धा तुळजाभवानीची. . . वक्ता महाराष्ट्राचा 2024 वर्ष 15 वे तुळजाभवानी  महाविद्यालय, तुळजापूर येथे आयोजन करण्यात आले असून. सदरील स्पर्धेचे उद्घाटन आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते, तहसिलदार अरविंद बोळंगे, सह अन्य मान्यवरांचा उपस्थितीत होणार आहे.

सदरील स्पर्धेत तीनही गटांसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 197 शालेय स्पर्धकांना आपली पूर्व नाव नोंदणी केली असून प्रत्यक्ष नाव नोंदणी करण्याची सुविधा ही उपलब्ध आहे.  तसेच सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शालेय विद्यार्थ्यांचे स्वतंत्र वर्गात भाषणे होवून सायंकाळी पाच वाजता पारितोषिक वितरण समारंभ निलेश लंके, विधान सभा सदस्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई, सुजितसिंह ठाकूर, माजी विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई अतूल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, धाराशिव, सोमनाथ माळी, विद्याभाभी गंगणे, अपर्णा नागेश नाईक ऋषिकेश मगर, गुलचंद  व्यवहारे, अमोल कुतवळ, प्रवीण कदम,जगदीश पाटील, ज्योती राऊत, यांच्या शुभहस्ते होणार आहे असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे स्पर्धेचे अमर हंगरगेकर, महेंद्र कावरे, किरण हंगरगेकर यांनी दिली.


 
Top