तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सवास पौष शुध्द 8शकेरोजी गुरुवारी (दि.18 ) रोजी श्रीगणेश विहारमध्ये घटस्थापना करण्यात येवुन प्रारंभ झाला.
श्रीतुळजाभवानी मातेची निद्रस्त मूर्ती गुरुवार दि. 18 जानेवारी रोजी पहाटे गाभाऱ्यातील सिंहासनावर पहाटे विधीवत अधिष्ठीत करण्यात आली. नंतर देविजीस अभिषेक पुजा करण्यात आल्या नंतर देविजीस वस्ञोलंकार घालण्यात आले. पुनश्च सकाळी सहा वाजता देविजीस सिंहासन व भाविकांचे अभिषेक पुजा करण्यात आल्या त्या नंतर देविजीस वस्ञ घालण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता मंदिरातील श्रीगोमुख तीर्थकुंडातून घटकलश वाजतगाजत मिरवणुकीने मंदिरात आणण्यात आले. श्रीगणेश ओवरीत शांकंभरी देवि प्रतिमा प्रतिष्ठापना करुन पुजन करुन घटस्थापना करण्यात आली. यावेळी यजमान श्री व सौ विनोद सुनिल सोंजी या महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, आजचा पूजेचे मानकरी भोपे पुजारी शुभम कदम, मंदिराचा प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार सोमनाथ माळी, वित्त व लेखाधिकारी तथा धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर शिंदे, लेखापाल तथा सहायक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, भोपे पुजारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांयकाळी देविजींना भक्तांचा अभिषेक पुजा केल्यानंतर वस्ञोलंकार घालण्यात आले. नंतर आरती करण्यात येवुन मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आला. महंत वाकोजी बुवा, गुरुतुकोजी बुवा यांनी प्रक्षाळ पुजा केली व मंदीर बंद करण्यात आले.