धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा परिषद धाराशिव आयोजित कर्मचारी व अधिकारी क्रीडा स्पर्धा व संस्कृतिक कार्यक्रमात एकांकिका स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आल्याबद्दल उपमुख्यकार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा अधिकारी इगे, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, जि प. सर्व विभाग प्रमुख यांच्या हस्ते सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

जुन्या काळातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा व त्यातील करावयाचे बदल या विषयावर एकांकिका सादर करण्यात आली. या एकांकिकामध्ये शिक्षकांच्या भूमिकेत शिक्षण विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम, विद्यार्थ्यांच्या भूमिकेत शिक्षण विस्तार अधिकारी भारत देवगुडे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक उदय पाटील, शिक्षक विनोद गाडेकर, सहायक कार्यक्रम अधिकारी अश्विनी सौदागर, आरोग्य सेविका सुवर्णा सुरवसे, आमदाराच्या भामिकेत आबासाहेब कुतवळ, पालक सरपंचाच्या भूमिकेत अळणीचे मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी उत्कृष्ट पणे सअभिनय भूमिका पार पाडली. सदर एकांकिकाचा जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला. त्याबद्दल सर्व कलाकारांचा वरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून सन्मानित करण्यात आले. वरील सर्व कलाकारांचे जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत आहे.


 
Top