लोहारा (प्रतिनिधी)-तालुक्यातील सालेगाव येथील रहिवासी सोजरबाई सिद्राम दुधभाते (वय 74 वर्षे) याचे दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सालेगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिद्राम शंकर दुधभाते यांच्या त्या पत्नी होत. तसेच महावितरणच्या कल्याण परिमंडल येथे कार्यरत असलेले जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दुधभाते यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या मागे मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


 
Top