धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील आळणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणीच्या मैदानावर दि. 10 जानेवारी 2024 रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.

 या बाल आनंद मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी पालेभाज्या फळभाज्या मिठाईची तसेच विविध खाद्यपदार्थाची तसेच मनोरंजनात्मक खेळ व शालेय साहित्याची वेगवेगळी एकूण 109 दुकाने मांडली होती. यावेळी आळणी गावचे सरपंच श्री.प्रमोद काका वीर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार नांदे उपाध्यक्ष सौ अफसाना शेख मॅडम,उपसरपंच कृष्णा गाडे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्याम बापू लावंड,दादासाहेब गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य श्री.अक्षय कदम, सौ संजीवनी पौळ,प्रसाद वीर,धनंजय वीर, किरण कोळी,पोपट कोळी, गणेश निंबाळकर, पांडुरंग निंबाळकर,ज्ञानेश्वर निंबाळकर,पवन पौळ, पवन निंबाळकर, सचिन खोबरे, नवनाथ गाडे, विनोद वीर,विशाल वीर, इसाप्पा कोळी, मधुकर कोरे,अण्णा कदम,अंकुश माळी,अण्णासाहेब राऊत,दत्ता वीर, सुनील गाडे,अमोल कोरे, सचिन कोळी, हरिदास भांडेकर,संभाजी माळी, प्रशांत म्हेत्रे,ज्योतीराम माळी, निलेश कदम, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री विश्वनाथ खरे यांच्या हस्ते फीत कापून बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मेथी,पालक,कोथिंबीर,शेपू, वांगे,बटाटे, कडीपत्ता, हादगाफुले,आदी पालेभाज्या तसेच टोमॅटो,बटाटे, दोडके,मिरची कांदे,लसूण, अद्रक, मिरची,कांदे घेवडा,मटार या फळभाज्यांचे दुकाने मांडली.

 पेरू, लिंबू,बोर,सीताफळ,रामफळ, सफरचंद,अननस, केळी,पपई यासारखी फळे विक्री ठेवली होती. इडली, सांबर,ढोकळा, उडीद वडे,आप्पे,दहिवडा यासारख्या दक्षिणाच्या खाद्यपदार्थ सोबत मिसळ, पाववडा, पॅटीस,बटाटे वडा,अळू वड्या, भजे,पापड, मिसळ, धपाटे ढोकळा,बाकरवडी, शाबू वडा, पावभाजी, समोसे,कोथिंबीर वड्या,चिरोटे, फरसाण, भजी पाणीपुरी भेळ या यासारखे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ सुद्धा विक्रीसाठी ठेवण्यात आले होते तसेच चहा मिठाई व उसाचा ताजा रस यासारख्या दुकानाने ही बाजार अधिकच फुलून गेलेला होता यावेळी बाल विक्रेत्यांनी मांडलेल्या आनंद बाजाराच्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची अक्षरशा झुंबड पडली होती.

 बाल आनंद मेळावा हा उपक्रम आमच्यासाठी नवा असून तो मनाला आनंद व समाधान देणारा आहे अशी प्रतिक्रिया विद्यार्थी व पालकांनी नोंदवल्या तर व्यवहारिक ज्ञानाचे कृतिशील शिक्षण मिळावे विद्यार्थ्यांनी व्यवहारातील जमाखर्चचा ताळेबंद व्यवस्थित रित्या समजावा.व्यवहारातील नफा तोटा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी याचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्याला मिळावे व भावी आयुष्यातील विद्यार्थ्यांची व्यावसायिक जडणघडण सदर उपक्रमाच्या माध्यमातून व्हावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे शाळेचे मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी सांगितले.

 यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व गावातील नागरिक विद्यार्थी यांनी बाल आनंद मेळाव्यातून विविध वस्तू आणि पदार्थ खरेदी केले. यामध्ये एकूण 22149 रुपयांची उलाढाल झाली यावेळी खरेदी विक्री करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अनोखा आनंद दिसून येत होता. तसेच उसाचा रस विक्री करणाऱ्या स्टॉलवर फोन पे च्या माध्यमातून  व्यवहार सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.यानिमित्ताने मुलांना डिजिटल व कॅशलेस व्यवहाराची ओळखही झाली. 

आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला. सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बशीर तांबोळी, काळे, पेठे, श्रीमती डोंगरे, कराड, नरवटे, मते,ढगे, म्हेत्रे, वीर, माने,भांगे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.


 
Top